अल्पसंख्यांक वस्तीतील कब्रस्थान सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

अल्पसंख्यांक वस्तीतील कब्रस्थान सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

शेखर निकम यांच्या कार्यकुशलतेमुळे संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीचा बदलणार चेहरामोहरा

 

संगमेश्वर :अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीमध्ये कब्रस्थान सुशोभीकरणासाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आंगवली, हातीव, कसबा, फणसट, सांगवे, रामपेठ आदी वस्तींचा समावेश आहे.

ही महत्वाकांक्षी योजना कोकणचे लोकप्रतिनिधी आमदार शेखर निकम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. त्यांचे अथक परिश्रम आणि जनतेच्या सेवेसाठी असलेली निस्सीम बांधिलकी यामुळेच हा निधी मिळवता आला आहे. या योजनेमुळे अल्पसंख्यांक समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. कब्रस्थानांच्या सुशोभीकरणामुळे परिसराचा विकास होईल तसेच समाजातील धार्मिक व सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणांचे संवर्धन होईल. हा निर्णय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरणार असून आमदार शेखर निकम यांच्या कार्यकुशलतेमुळे संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

अल्पसंख्यांक वस्तीसाठी विकास निधी आणून आपण धर्मनिरपेक्षक असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सिद्ध करून दाखवले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देऊन आपल्या कोकणवासीयांसाठी मग तो कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा असो त्याच्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करून मदत मिळवून देण्याचे काम निकम यांनी आजपर्यंत केले आहे. त्यामुळेच कोकणवासीयांच्या मनातले लोकप्रिय आमदार म्हणून त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या अल्पसंख्यांक वर्गाच्या कब्रस्तान सारख्या भावनिक विषयाकरिता विकास निधी आणून शेखर निकम यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याबद्दल त्यांचे अल्पसंख्यांक वर्गाच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.