शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी

शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी

पुणे (प्रतिनिधी) : शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी करण्यात आली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेड व भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच मराठी बिग बॉस फेम सौ. तृप्तीताई देसाई , इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. निकिताताई दामले, मॅग्नोलिया वुमेन्स असोसिएशन च्या प्रशासक सौ. गौरीताई ढोले पाटील,नूतन ताई बनकर, संयोग वेंचरच्या अध्यक्षा सौ. सपना काकडे उपस्थित होत्या.आजच्या कार्यक्रमासाठी प्रायोजित बक्षिसामध्ये रोख पारितोषिके सौ. पुनम भिक्षावातीमठ (अध्यक्षा, पर्ले ब्युटी पार्लर व सौ.अश्विनी जाधव अध्यक्षा, व्हायब्रंट सोशल फाउंडेशन) यांनी केलेले आहे.त्याबद्दल त्यांचे आभार संस्थेतर्फे मानण्यात आले. या वेळी त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता इंडिया फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. रिता शेटिया मॅडमनी केले.

शारदा शिक्षण संस्थेतर्फे यावर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रा. सौ. अनुजा गडगे आणि सौ.अपर्णा जमदाडे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी देण्यात आला. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार ,निबंध लेखन पुरस्कार देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *