पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली) आयोजित शिबिरात १२५ जणांचे रक्तदान

पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली) आयोजित शिबिरात १२५ जणांचे रक्तदान

पुणे : पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या (तपकीर गल्ली) वतीने आयोजित शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. साधू वासवानी मिशनच्या मेडिकल कॉम्प्लेक्स संचालित इनलॅक अँड बुधरानी हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या सभागृहात आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 
पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनचे (तपकीर गल्ली) अध्यक्ष सुरेश जेठवानी, उपाध्यक्ष हरेश कुकरेजा, सचिव हेमंत शाह, सहसचिव दीपक वाधवानी व सचिन तलरेजा, खजिनदार मनजीत दुप्पर, कार्यकारिणी सदस्य दिनेश शहा, विजय दासवानी, मुकेश जेठवानी, शीतल ओसवाल, कुणाल शहा, संजय माखिजा, संजय ओसवाल आदी उपस्थित होते. निलेश तेजवानी यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नरेश लोहार, प्रवीण लोहार, निलेश येमूल यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
 
सुरेश जेठवानी म्हणाले, “पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली) ही इलेक्ट्रिक व्यापाऱ्यांची संस्था १९९० पासून कार्यरत असून, अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. २७५ पेक्षा अधिक आजीवन सदस्य आहेत. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत घेण्यात येतात.”

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *