आपले आरोग्य ही फक्त आपली संपत्तीच नसुन आरोग्यातच सौंदर्य ही दडलेले आहे ! म्हणुनच आपल्या स्वास्थ्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाच्या या संकटात “स्वास्थ्य” किती महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येक कुटुंबाला झालेली आहे. स्वास्थ आणि सौंदर्य जपण्याचा महाराष्ट्राच्या सौभाग्यवतींनी ‘संकल्प’ केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला तिची आवड जोपासण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच लॉकडाउन काळात पडद्यामागील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या जगण्याला नवीन उमेद देण्यासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्याच्या मेधा जोशी प्रथम आल्या तर अनामिका ओव्हाळ द्वितीय आणि गौरी पांडे तृतिय क्रमांकाच्या विजेत्या झाल्या.
‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्था प्रायोजित सह कुसमवत्सल्य फांउडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांनी सहभाग घेतला होता. सुमारे २८ महिलांनी अंतिम फेरी पर्यंत धडक मारली. स्पर्धेची अंतिम फेरी महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या भारती चंगेडिया कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या, ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्थेच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव, संशोधन आणि विकास प्रमुख शर्वरी डोंबे, कुसमवत्सल्य फांउडेशनच्या वैशाली पाटील, सहारा प्रोडक्शनचे डॉ. राजेंद्र भवाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारती चंगेडिया म्हणाल्या कि, डॉ. पी. एन. कदम यांच्या 30 वर्षांच्या सखोल संशोधन आणि प्रयोगाद्वारे “आहार आणि आरोग्य” या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ‘संकल्प™’ने लॉकडाऊनच्या 3 महिन्यात आपल्या संशोधनाचा वापर करुन “आरोग्य आणि आहार” क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. लॉकडाउन दरम्यान प्रत्येक घरातील स्त्रीला मोठ्या प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागली. या सर्व जबाबदारीतून थोडा विरंगुळा मिळण्याबरोबर स्वत:चे स्वास्थ आणि सौंदर्य जोपासण्याची गोडी लागली पाहिजे. या उद्देशाने संकल्पतर्फे नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन स्त्रियांच्या स्वास्थ आणि सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टर्सकडून रिसर्च करुन याबाबतील सौंदर्य प्रसाधने उपलब्ध केली आहेत. विशेषत: महिलावर्गाला कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लाभ मिळवून देणारी आणि ज्यांची ज्ञान घेण्याची, कष्ट करण्याची तयारी आहे अशा प्रत्येकासाठी संकल्पने एक सक्षम योजना तयार केली आहे. त्यामुळे गृहिणींना आपल्या स्थास्थ, सौंदर्यांबरोबरच व्यवसायकरुन एक परिपुर्ण आत्मनिर्भर स्त्री बनण्याची संधी ‘संकल्प’च्या वतीने देण्यात आली आहे.