पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आयोजित श्रीमती मालतीबाई सराफ स्मृती व्याख्यानमालेत मिस वर्ल्ड युक्ता मुखी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या सोमवारी (ता. २३) सायंकाळी ५.४५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर युक्ता मुखी बोलणार आहेत. झूम मीटवर, तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या फेसबुक पेजवर हे व्याख्यान प्रसारित होईल. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://us02web.zoom.us/j/7563662626?pwd=K3NxTExJN2ovQXZuanRWaVl4aWdBZz09 या झुम लिंकवर (आयडी : ७५६३६६२६२६, पासवर्ड : आरव्हीएस११) जावे किंवा https://www.facbook.com/MaViPa.pune या फेसबुक लिंकवर सहभागी व्हावे, अशी माहिती विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली.
युक्ता मुखी यांनी १९९९ साली मिस वर्ल्ड किताब पटकाविला. त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. एचआयव्ही, स्तनाचा कर्करोग आणि थॅलेसीमियामुळे पीडित लोकांसाठी काम केले. तसेच सामाजिक वनीकरण, स्वच्छ व सुंदर परिसर आदी सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. त्यांचा कल्याणीनगरमधील सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग होता. कमीतकमी संसाधनांचा व रसायनमुक्त वस्तूचा वापर, शून्य कचरा निर्मिती, पुनर्वापर आदी संकल्पना राबविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. त्या अनुषंगाने युक्ता मुखी पर्यावरणपूरक जीवनशैली प्रत्यक्षात कशी अंगीकारावी, याविषयी बोलणार आहेत, असे सराफ यांनी कळवले आहे.Attachments area