
पुणे : “ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा, त्याचा सर्व जगावर ताबा!” आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती हि कमी-अधिक प्रमाणात मानसिक दृष्ट्या तणावात असताना, मनो-नियंत्रण आणि दृष्टिकोन बदल कार्यशाळा ही निश्चितच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. पी एन कदम यांनी केले.
संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन तर्फे ‘ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा त्याचा सर्व जगावर ताबा’ याविषयावर जीवनात अमुलाग्र बदल घडवणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात निवडक 25 लोकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसातील पंधरा तासांमध्ये मन म्हणजे नेमके काय? इथून सुरुवात झालेली ही कार्यशाळा दुसऱ्या दिवशी सायंकाळी वर्तणूक थक्क करणाऱ्या प्रयोगापर्यंत पोहोचली होती. तो अनुभव घेणारे प्रशिक्षणार्थी आनंद शिखरावर पोहोचले होते. प्रयोगातून आणि खेळातून शिक्षण मनासारखा क्लिष्ट विषय शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवत असताना प्रत्येकाला समजेल अशा सोप्या आणि सुलभ भाषेत हसत-खेळत डॉक्टर कदम यांची शिकवण्याची पद्धत हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. असे संकल्प च्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव व रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्या मुख्य शर्वरी डोंबे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अनेक मान्यवरांनी ही दोन दिवसांची कार्यशाळा अनुभवली. सकाळ ईन नेटवर्कचे श्री.तेजस गुजराथी, सातारा येथील वंडर सायन्सचे डॉ. किरण जोशी, खुशी जोशी, क्रिएटर थ्री चे डायरेक्टर लव शहा आणि कनिष्का शहा, ऊर्जा फाऊंडेशनचे यशवंत आणि प्रनोती शितोळे यांनी यात विशेष सहभाग घेतला होता.