२०१६ मधील भोसरी एमआयडीसीतील जागेप्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणातील याचिकाकर्ते कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भूखंड गैरव्यवहाराचा लढा ऍड. असीम सरोदे यांनी लढला होता. भोसरी येथील ‘एमआईडीसी’च्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांचेसह इतर काहीजणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता तोच तपास पुन्हा सक्तवसुली संचालनालय करत आहे आणि या चौकशीसाठी कायदेतज्ञ असीम सरोदे यांची मदत मागितली आहे.