अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या
१०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने (कला, वाणिज्य व विज्ञान) शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. या यशामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था व्यवस्थापन सर्वांचे योगदान मोलाचे राहिले. कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून ३७० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते.
विज्ञान शाखेत हर्षाली रमेश कुंजीर (८९.५० टक्के), श्रेय दिलीप सराफ (८८.६७ टक्के), अरुंधती अमरसिंग तावरे (८७.८३ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. अखिलेश नितीन लोणकर याने आयटी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले. कविता आनंद कनकणे हिने हिंदी विषयात ९५, तर दामोदर केतन पेंडसे याने गणित विषयात ९८ गुण मिळवले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे अध्यक्ष मोहनदादा जोशी, संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, मुख्याध्यापिका विद्या कांबळे यांनी पेढे भरवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण निकालाबद्दल कौतुक केले.