पिंपरी चिंचवड अग्निशामक दलात अत्याधुनिक ड्राय केमिकल पावडर वाहनाची भर

पिंपरी चिंचवड अग्निशामक दलात अत्याधुनिक ड्राय केमिकल पावडर वाहनाची भर

 

रासायनिकऔद्योगिक आणि विद्युत आगींवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ठरणार उपयुक्त

 

पिंपरी, दि. ८- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक ड्राय केमिकल पावडर (डीसीपी) फायर टेंडर वाहन  (Dry Chemical Powder (DCP) Fire Tender Vehicle ) समाविष्ट करण्यात आले आहे. हे वाहन अग्निशमन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असून विविध औद्योगिकरासायनिक आणि विद्युत आगींवर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे.

 २०२१ मध्ये थेरगाव येथील मॅग्नेशियम पावडर हाताळणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात मॅग्नेशियम पावडरमुळे सदर कारखान्यांमध्ये मोठमोठे विस्फोट झाले होते. त्या विस्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. मॅग्नेशियम हे वॉटर रिऍक्टिव्ह केमिकल असल्याने त्यावर पाण्याचा मारा करता येत नाही. पाण्याचा मारा केल्यास विस्फोटाचे व आगीचे प्रमाण अधिक वाढते. याठिकाणी अग्निशमन दलाने वाळू आणि मातीचा वापर करून आग विझवली. आता मात्र अशा आपत्कालीन परिस्थितीत अत्याधुनिक डीसीपी वाहन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या वाहनात विशेष प्रकारची ड्राय केमिकल पावडर असते. ही पावडर आगीच्या केमिकल रिऍक्शन नष्ट करून स्फोट होण्याची शक्यता कमी करतेव आग विझविण्याचे कार्य सुरक्षितरित्या पूर्ण करते.

गेल्या काही दशकांत शहराच्या प्रचंड गतीने झालेल्या विस्तारामुळे व औद्योगिकीकरणामुळे संभाव्य धोके आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ करणे काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने डीसीपी वाहन  (DCP vehicle)  उपयुक्त ठरणार आहे.

नवीन डीसीपी फायर टेंडरची वैशिष्ट्ये :

या वाहनात दोन स्वतंत्र व्हेसल्स (pressure vessels) बसविण्यात आले आहेत.

यातील एकात TEC प्रकारची पावडर तर दुसऱ्यात ABC प्रकारची पावडर साठवली जाते.

हे वाहन एकाच वेळी दोन्ही प्रकारच्या पावडरचा समांतर वापर करू शकते.

या तंत्रज्ञानामुळे हे वाहन इलेक्ट्रिकल पॅनेल्सपेट्रोलियम आधारित रसायनेगॅस सिलिंडर्सकेमिकल युनिट्सइंडस्ट्रियल टँक्स अशा जास्त धोका असलेल्या ठिकाणी कार्यक्षम ठरते.

कमी वेळात आणि कमी मानवी संसाधनांचा वापर करून हे वाहन आग नियंत्रणात आणण्याची क्षमता वाढवते.

वाहनावर उच्च दाबाचे नोजल्सटॉवर लाइटिंग सिस्टमकॅमेरा यंत्रणा व जलद प्रतिसाद यंत्रणा बसविण्यात आली आहे.

भारतीय परिस्थिती आणि रस्त्यांच्या अवस्थेला साजेसे असे हे वाहन अल्ट्रा-मोबाईल आणि हार्ड कोअर बॉडी युक्त आहे.

पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून  येथे रासायनिक व ज्वलनशील पदार्थांशी संबंधित अनेक युनिट्स कार्यरत आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास पारंपरिक पद्धतींचा मर्यादित उपयोग होतो. त्यामुळे डीसीपी फायर टेंडर हे एक क्रांतिकारी भर ठरणार आहे. विभागाच्या प्रतिसाद क्षमतेत आणि नागरिकांच्या सुरक्षेत हे वाहन निश्चितच नवा आयाम आणेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *